तेव्हा नाही वाटलं पाठीत खंजीर खुपसला? -राज ठाकरे

April 2, 2014 9:44 PM3 commentsViews: 4700

raj_dombivali_sabha02 एप्रिल :लिलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना दिवसभर सोबत होतो. हॉस्पिटल ते मातोश्री एकाच गाडीत बसून गेलो. मग तेव्हा नाही वाटलं का पाठीत खंजीर खुपसला ? बाळासाहेब कोमात जाईपर्यंत मी सूप पाठवतो होतो आणि ते घेत होते. ज्या राजाने सूप पाठवलं मग त्यांना कधी नाही वाटलं का पाठीत खंजीर खुपसला?

अनेकदा बाळासाहेबांशी फोनवर चर्चा केली. तेव्हा नाही वाटलं का ?, पाठीत खंजीर खुपसला ? असा खडा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

तसंच टाळी द्यायची होती तर ती ‘सामना’तून काय देतात. इतकं बोलणं होतं असताना फोन का केला नाही ? मी कधी गरज दाखवली नव्हती, तुम्ही गरज दाखवली असं प्रत्युत्तर राज यांनी उद्धव यांना दिलं. डोंबिवलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत खंजीर खुपसल्याच्या आरोपांमुळे व्यथीत झालेले राज ठाकरे यांनी भावनिक होतं जुन्या आठवणींचा खुलासा करत उद्धव ठाकरेंना अनेक सवाल विचारले.

आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा टोल आंदोलन

टोल विरोधात आंदोलन केलं सगळं झालं त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनीही आश्वासन दिलं आचारसंहितेपुर्वी राज्यातील 22 टोल बंद करण्यात येईल. पण कुठे झाले बंद ? उलट मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोल 18 टक्क्यांनी वाढवण्यात आला. या लोकांना शांतेतपणे सांगितलेलं समजत नाही. मीही आचारसंहिता संपण्याची वाट पाहतोय. एकदा आचारसंहिता संपू द्या मग बघा टोल कसे सुरू राहता असा इशारा देत राज ठाकरे यांनी टोल आंदोलन पुन्हा करणार असल्याचं जाहीर केलं. तसंच टोलचे पैसे खाऊन भुजबळ गब्बर झाले अशी टीकाही राज यांनी केली.

रामदास आठवले महाराष्ट्राचे लालू

बाबासाहेब आंबेडकर यंांचं भव्य स्मारक झालंच पाहिजे आणि तिथे भव्य वाचनालय उभारलं गेलं पाहिजे अशी मागणीही राज यांनी केली. तसंच आज दलित जनतेचे नेते म्हणून घेणारे रामदास आठवले स्वता: स्वार्थासाठी जे काँग्रेसमध्ये केलं तेच इथंही करताय. आपल्याला राज्यसभेची जागा मिळाली पाहिजे दुसर्‍यांचं काहीही होवो. मग हे कसले दलितांचे नेतृत्व करणारे नेते ? अशी टीका करत राज यांनी रामदास आठवले हे महाराष्ट्राचे लालू प्रसाद यादव आहे अशी खिल्लीही उडवली.

तेव्हा नाही वाटलं खंजीर खुपसला?

अलिबागला मनसेच्या पदाधिकार्‍यांचं शिबिर होतं. तिकडे जात असताना वाटेत लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा फोन आला. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असं सांगण्यात आलं. डॉक्टरांना सांगितलं, ‘त्यांना विचारा मी, येऊ का नको येऊ ?’ उद्धवनी होकार दिल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरलो. मुंबईकडे येत असताना पनवेलजवळ बाळासाहेबांचा फोन आला. “लवकर ये आणि हॉस्पिटलला पोहचं” असं बाळासाहेबांनी सांगितलं. अशा वेळी मी तिथे उभं राहणं हे माझं कर्तृव्य होतं म्हणून तिथे होतो. मीच काय कुणीही असतं तरी तो तिथे पोहचला असता. दिवसभर हॉस्पिटलमध्ये उद्धवांच्या सोबत होतो. बरं, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर पडलो. माझ्याच गाडीत बाजूला उद्धव बसलेला होता. आम्ही मातोश्रीवर पोहचलो. हॉस्पिटल ते मातोश्रीपर्यंत येईपर्यंत तेव्हा नाही वाटलं का बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला?

बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत स्वत: बाळासाहेब फोन करून मातोश्रीवर बोलवून घ्यायचे. एकदिवशी बाळासाहेब आणि मी बसलो होतो. तेव्हा बाळासाहेबांच्यासमोर दोन लहान तेलकट बटाटेवडे आले. बाळासाहेबांना विचारलं तर ते म्हणाले, “काय करणार जे समोरं येत ते खावं लागतं.” मग मी त्यांच्यासाठी चिकण सूप पाठवतो म्हणून विचारलं. तर बाळासाहेब म्हणाले, “घेऊन ये मग चाखून बघतो”. बाळासाहेब कोमात जाईपर्यंत मी सूप पाठवतो होतो आणि ते घेत होते. त्यांना कधी नाही वाटलं का जो राजा त्यांना रोज सूप पाठवत होतो तो त्यांच्या पाठीत खंजीर खुपसेल ?

अनेकदा बाळासाहेबांसोबत फोनवर चर्चा व्हायची. तेव्हा नाही वाटलं का ? पाठीत खंजीर खुपसला? पनवेलमधून येताना बाळासाहेबांनी नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांना का नाही फोन केला ? मग मी कसा पाठीत खंजीर खुपसला ? या टोणक्याच्या नांदाणपणामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो असा भावनिक खुलासा राज यांनी केला. मला या गोष्टीचं भांडवलं करायचं नाही, आणि याची गरजही नाही पण वारंवार हेच सांगता पाठीत खंजीर खुपसलं म्हणून संताप अनावर झाला आणि हे सांगावं लागलं असा खुलासाही राज यांनी केला.

close