महायुतीची घोडदौड कायम, आघाडी पिछाडीवर

April 3, 2014 12:08 AM0 commentsViews: 3333

loksabha election 201402 एप्रिल : लोकसभा निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरू झाले असून लढाई लोकसभेची कोण जिंकणार यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पण आज जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोण बाजी मारणार यासाठी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच CSDS नं आयबीएन नेटवर्क आणि द वीकसाठी सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार राज्याच्या लोकसभेच्या आखाड्यात महायुती बाजी मारेल असा कौल जनतेनं दिलाय. शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी मिळून एकत्र आलेल्या ‘पाच पांडवा’च्या महायुतीला 24 ते 30 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 16 ते 22 जागा येतील. आणि इतर पक्षांमध्ये मनसे, आम आदमी पार्टीला 1 ते 3 जागा मिळतील. राज्यातील जनतेचा पक्षांसाठीचा कौल पाहिल्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच हे पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचं 42 टक्के जनतेनं कौल दिलाय. तर राहुल गांधी यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिलीय.

टक्केवारीचं गणित

मतांची टक्केवारीनुसार महायुतीची टक्केवारी मागिल 2009च्या निवडणुकीत 37.8 टक्के होती ती यावेळी 43 टक्के इतकी झालीय. तर आघाडीची टक्केवारीही 38.9 टक्के होती ती आता 33 टक्क्यांवर आलीय. मनसेची टक्केवारी ही 4.1 टक्के होती ती आता 3 टक्के इतकी आहे. आपची टक्केवारी मनसेपेक्षा 2 टक्क्यांनी जास्त असून ती 5 टक्के इतकी आहे. आणि बसपाची टक्केवारी 4 टक्के आणि इतर पक्षांची एकूण 12 टक्के इतकी आहे. राज्याच्या कौलवरुन यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का असा सवाल विचारला असात 23 टक्के जनतेनं होकार दिलाय तर 58 टक्के जनतेनं नकार दिलाय.

 
विभाग’वार’ परिस्थिती

महाराष्ट्रात विभागानुसार पाहिलं तर दुष्काळ,पाणीटंचाई आणि सिंचन घोटाळा आणि वेगळा विदर्भ मागणीमुळे विदर्भात कुणाचं वर्चस्व असणार याचा कौल घेतला असता विदर्भामध्ये भाजप-सेनेला मोठी आघाडी मिळेल. तर भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या नागपुरच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी उतरलेल्या ‘आप’चा प्रभाव दिसून येणार आहे. तर दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजप-सेनेला किंचित आघाडी मिळेल. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आपले स्थान कायम राखण्यासाठी आघाडीवर आहे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप-सेनेला मोठी आघाडी मिळेल. तर राजधानी मुंबई आणि ठाण्यामध्ये भाजप-सेनेला आघाडी मिळेल आणि कोकणामध्ये भाजप-सेना आघाडीवर असून आपचाही इथे प्रभाव आहे.

राज ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पहिल्या निवडणुकीला सामोरं जातं आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यापैकी कोण अधिक सक्षमपणे पुढे नेईल असा सवाल विचारला असता 14 टक्के जनतेनं उद्धव ठाकरे वारसा पुढे नेईल असं म्हटलंय. तर 27 टक्के शिवसैनिकांनी कौल दिलाय. तर मनसेचे अध्यक्ष आणि बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे वारसा पुढे नेतील हे 41 टक्के लोकांना वाटतंय तर 51 टक्के शिवसैनिकांनी राज यांना कौल दिलाय. तर दोघंही 10 टक्के वारसा पुढे नेतील असा कौल जनतेनं दिलाय. तर लोकसभेसाठी राज यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. मोदींना पाठिंबा देण्याचा राज यांचा निर्णय महायुतीच्या फायद्याचा आहे का ? असा सवाल विचारला असता 40 टक्के लोकांनी होकार दिलाय तर 20 टक्के लोकांनी नुकसान होईल असं म्हटलंय. तर भाजपच्या 51 टक्के मतदारांना योग्य वाटतंय तर सेनेच्या 43 टक्के, मनसेच्या 58 टक्के, आणि आघाडीच्या 35 मतदारांना फायद्याचा निर्णय वाटतोय.

 

================================================
विभागवार चित्र

विदर्भ          –    भाजप-सेनेला मोठी आघाडी, आपचाही प्रभाव
मराठवाडा    –     काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजप-सेनेला किंचित आघाडी
प.महाराष्ट्र    –    काँग्रेस-राष्ट्रवादीेक्षा आघाडीवर
उ.महाराष्ट्र    –   भाजप-सेनेला मोठी आघाडी
मुंबई-ठाणे   –     भाजप-सेनेला आघाडी
कोकण       –        भाजप-सेना आघाडीवर, आपचाही प्रभाव

================================================

सरकारच्या कामगिरीवर समाधानी?

================================================

                                                    फेब्रु.2014    मार्च2014
राज्य सरकारची कामगिरी              -5%        -9%
केंद्र सरकारची कामगिरी                   -1            +1

================================================

- यूपीएला पुन्हा संधी द्यावी का?

================================================
                                   फेब्रु.2014         मार्च2014
होय                             25%                   23%
नाही                            57%                   58%
सांगता येत नाही        18%                    19%

================================================

जागांचा अंदाज – महाराष्ट्र (48 जागा)

================================================

                2009    मार्च2014
महायुती        21        24-30
आघाडी          25        16-22
इतर+             2        1-3    

इतर+ = आप, मनसेसह इतर पक्ष

================================================

close