विंडोज XP : पुढे काय?

April 3, 2014 11:46 AM3 commentsViews: 6642

blog amruta durve ibn lokmat- अमृता दुर्वे, सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

विंडोज XP ऑपरेटिंग सिस्टीमसाठी असलेला सपोर्ट आपण 8 एप्रिलपासून बंद करणार असल्याचं मायक्रोसॉफ्टने जाहीर केलं आणि सगळीकडे खळबळ उडाली. ऑपरेटिंग सिस्टीमसाठी असणारा सपोर्ट म्हणजे या OS साठी येणारे अपडेट्स, सिक्युरिटी अपडेट्स या सगळ्या गोष्टी. विंडोज XP ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात येऊन 13 वर्षं झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टने हा निर्णय घेतलाय. एका अंदाजानुसार जगातले 30 टक्के इंटरनेट कनेक्टेड पीसीज विंडोज XP वर चालतात. मग आता मायक्रोसॉफ्टने सपोर्ट थांबवल्यानंतर नेमकं काय होणार ?

8 एप्रिलनंतरही तुमचा पीसी / लॅपटॉप आता सुरू आहे, तसाच सुरू राहील, त्यात काही फरक पडणार नाही. पण फक्त त्या OS साठी विंडोजकडून येणारे अपडेट्स बंद होतील. म्हणजे याचा थेट परिणाम असेल तो सिक्युरिटीवर. कारण अपडेट्समधून येणारं सोल्यूशन किंवा बग प्रोटेक्शन तुम्हाला मिळणार नाही. यावर उपाय म्हणून सगळ्यात आधी एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे XP साठी मायक्रोसॉफ्टने दिलेला फायनल सिक्युरिटी अपडेट इन्स्टॉल करा. यासोबतच तुमच्या पीसी / लॅपटॉपवर चांगलं आणि अपडेटेड ऍण्टीव्हायरस सॉफ्टवेअर असायलाच हवं. म्हणजे मायक्रोसॉफ्टकडून अपडेट्स आले नाही, तरी ऍण्टीव्हायरस सॉफ्टवेअरकडून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स आणि त्यायोगे सिक्युरिटी थ्रेट्सकडून प्रोटेक्शन मिळत राहील.windows xp

तुमच्या पीसी / लॅपटॉपमध्ये असलेली सगळी सॉफ्टवेअर्स अप – टू – डेट हवीत. कारण जुन्या व्हर्जनचं सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर सिक्युरिटीला धोका. इंटरनेटला कनेक्टेड असणार्‍या प्रत्येक लॅपटॉपला काही प्रमाणात सिक्युरिटी थ्रेट ही असतेच आणि तशीच ती तुमच्या पीसीलाही असेल.

मायक्रोसॉफ्टने सपोर्ट थांबवल्यानंतरही तुम्ही हीच OS वापरत राहिलात तर सुरुवातीला काही प्रॉब्लेम्स कदाचित येणार नाहीत. पण कालांतराने मात्र अडचणी यायला लागतील. कारण त्या OS साठी उपलब्ध असणारी सॉफ्टवेअर, अपडेट्स कमी कमी होत जातील. अशाच प्रकारे इतर नवीन येणार्‍या सॉफ्टवेअरसाठीच्या गरजांमध्ये कदाचित विंडोज XP चा समावेश नसेल.

विंडोज XP वर तुम्हाला इंटरनेट एक्स्प्लोरर 9 पुढची व्हर्जन इन्स्टॉल करता येत नाही. पण सध्यातरी क्रोम आणि फायरफॉक्स या दोन्ही ब्राऊजर्सच्या अपडेट व्हर्जन्स XPसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे इंटरनेट ब्राऊजर बदलणं योग्य ठरेल कारण इतर दोन ब्राऊजरकडे लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट्स असतील.

ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड करणं हा या सगळ्यावरचा उपाय आहे, पण घाईघाईत OS अपग्रेड करण्याआधी तुमचा लॅपटॉप ती सपोर्ट करणार आहे का ते तपासून पहा. कारण तुमचं हार्डवेअर जुनं असेल तर नव्या ऑपरेटिंग सिस्टीमने पीसी फास्ट होण्याऐवजी अगदी स्लो होईल आणि नवीन लायसन्स्ड कॉपी घेऊन काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्याच्या आधी ही गोष्ट नक्की तपासून पहा.

 • Vikram Sawant

  hiii amruta
  i want to ask that is it a good chance for android to get in now at computers market and make a nice empact with thier most populer OS which they have done it with huge in mobiles and tablets world?
  or
  windows want to come with only and only with windows 8 and beyond that,isn’t it?

  • Amit Chougule

   hiiii Vikram,
   I want to tell u that there is one another os is present which is called linux. which can be used by people and android also having some limitations but linux can be installed on 256 mb RAM with 32 gb HD so its more useful to people to chenge the cofiguration of our PC chenge the OS. and there are so many benifits of linux on windows. android is one part of linux. now linux mobiles are also in market by samsung.

 • umesh jadhav

  मला तुमचा ब्लॉग थोडा अपूर्ण
  वाटला म्हणून थोडी भर टाकावीशी वाटली I HOPE YOU DON’T
  MIND (तसंही ब्लॉगर
  आणि वाचक कमेंट्सना फारसं महत्व देत नाहीत.असो.) मायक्रोसॉफ्टनं याचं असं स्पष्टीकरण दिलं आहे की
  ते विंडोज एक्स पी ला गेल्या बारा वर्षा पासून टेक्निकल सपोर्ट पुरवत आलेले आहेत
  पण आता तंत्रज्ञान क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की ते त्यांच्या हार्डवेअर आणि
  सोफ्टवेअर पुरवणाऱ्या भागीदारांसोबत नवीन आलेल्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त
  चांगल्या प्रकारे वापर करून ग्राहकांना नाविन्यपूर्ण उत्पादनं देण्यावर भर
  देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या विंडोज एक्स
  पी वर जास्त लक्ष केंद्रित न करता नाविन्याची कास धरून ग्राहकांना वेगळ्याच अनुभव
  विश्वाची ओळख करून द्यावी.पण ह्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी असं मानतात की विंडोज ८
  ही कार्यप्रणाली जी खास करून मायक्रोसॉफ्टच्या विंडोज मोबाईल साठी विकसित करण्यात
  आली होती ती त्या मोबाईलच्या अपयशा मुळे पूर्णतः बोंबलली तसेच तिचा टाईल शेप युजर
  इंटरफेसही ग्राहकांना फारसा आवडला नाही ज्यामुळे मुख्य कार्यकारी अध्यक्ष स्टीव
  बामर यांना पायउतार व्हावं लागलं त्या विंडोज ८ च्या पुनरुज्जीवनासाठी हा सगळा
  खटाटोप चालला आहे.विंडोज मोबाईलचा अमेरिकी बाजारपेठेतील हिस्सा हा केवळ ४% आणि
  चीनी बाजारपेठेतील हिस्सा हा केवळ १% इतकाच आहे.तसेच त्यांनी आणलेला टॅबलेटही
  ग्राहकांना जास्त आकर्षित करू शकला नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे स्मार्ट फोन आय
  पॅड टॅबलेटमुळे गेल्या काही वर्षाचा डेस्कटॉप आणि लॅपटॉपचा खप अतिशय रोडावला आहे
  ज्याचा सरळ सरळ फटका मायक्रोसॉफ्टला बसत आहे.त्यामुळे एका स्ट्रॅटेजिक निर्णया
  अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं आहे ज्यात मायक्रोसॉफ्टचे सगळे प्रोडक्ट्स हे एकाच
  कार्यप्रणालीवर चालतील ज्यामुळे ग्राहकांना ती वापरण्यास सहज सुलभता येईल आणि
  वेगवेगळ्या कार्यप्रणालीची वेगवेगळी उत्पादनं वापरण्यापेक्षा ग्राहक एकच
  कार्यप्रणाली असलेली मायक्रोसॉफ्टची विविध उत्पादनं वापरतील व ही कंपनी ह्या
  क्षेत्रात जायंट्स समजल्या जाणाऱ्या अॅपल सॅमसंग आणि गुगलला चांगली टक्कर देऊ
  शकेल.

close