वरुण गांधींना दिली निवडणूक आयोगाने चपराक

March 23, 2009 5:34 AM0 commentsViews: 5

23 मार्च उत्तर प्रदेशातील पीलभीत मतदारसंघातल्या प्रचारसभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधींना निवडणूक आयोगानं ठरवलं दोषी ठरवलं आहे. तसंच वरुण गांधींना तिकीट न देण्याचा सल्लाही निवडणूक आयोगाने भाजपला दिला आहे. पण भाजपनं निवडणूक आयोगाचा हा निर्णय पक्षपाती असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मतदारसंघात भाजपचे तरुण युवा उमेदवार आणि मनेका गांधीचे पुत्र वरुण गांधी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असं भाषण 6 मार्चच्या प्रचार सभेत केलं होतं. त्यादिवशी त्यांनी त्याच मतदारसंघात मुस्लिमांवर टीकेची झोड उठवली होती. सर्व हिंदूना एका बाजूला करून ' उरलेल्यांना ' पाकिस्तानात पाठवायला हवं, अशी विधानं केल्याचा वरुण गांधी यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलीभीत जिल्हाधिका-यांनी कलम 153 – अ, 123 – अ आणि 123 – ब या कलमांखाली अजामीनपात्र गुन्हा आणि भाजपलाही नोटीस बजावली होती. वरुण गांधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होती. प्रक्षोभक भाषणाप्रकरणी वरुण गांधी चांगलेच अडचणीत आले होते. त्यांना या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीसही बजावली होती, पण आपण कुठलंही प्रक्षोभक विधान केलं नसून सीडीतला आवाज आपला नसल्याचा दावा वरुण यांनी केला होता. हा आपल्याविरुद्धचा राजकीय कट असल्याचं ते म्हणाले होते. त्यांनी माफी मागायलाही नकार दिला होता. तर भाजपनं याप्रकरणाचा पक्षाशी संबंध जोडू नये अशी भूमिका वरुण गांधींनी घेतली होती. पण आता पीलभीतमधल्या प्रचारसभेतल्या वरुण गांधींच्या स्फोटक भाषणाप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगानं दोषी ठरवलं आहे. वरुण गांधींना उमेदवार यादीतून वगळावं, असे निर्देश निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला दिलेआहेत. त्याचबरोबर यापुढे अशा कुठल्याही प्रकारांना पाठिंबा देणारा पक्षही याबाबतीत तितकाच दोषी असू शकेल, असं मतही आयोगानं नोंदवलं आहे. संबंधितांना हिंसाचार, तसच सामाजिक ऐक्य बिघडवण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवलं जाईल, असा गंभीर इशाराही आयोगाने दिला आहे.

close