परवेज मुशर्रफ प्राणघातक हल्ल्यातून बचावले

April 3, 2014 12:44 PM0 commentsViews: 821

Image img_236302_parvezmushraf4_240x180.jpg03 एप्रिल :  पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्यावर एका हल्ल्याचा प्रयत्न झाला. पाकिस्तानमधल्या फैझाबादमध्ये आज सकाळी ही घटना घडली. या बॉम्बस्फोटातून मुशर्रफ थोडक्यात बचावले आहेत.

मुशर्रफ यांच्यावर इस्लामाबाद इथ एएफआयसी हॉस्पीटलमध्ये काही दिवसांपूर्वीपासून ह्रदयविकारावर उपचार घेत होते. ते काही दिवस आयसीयूतही होते. तिथून आज सकाळी 7 च्या सुमारास त्याच्या इस्लामाबाद इथल्या फार्म हाऊसवर जात असताना हा स्फोट झाला.  एका पुलाखाली हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. या पुलावरून मुशर्रफ यांचा गाड्यांचा ताफा गेल्यावर त्या पुलवर बॉम्ब स्फोट झाला. स्फोटासाठी 4 ते 6 किलो स्फोटक वापरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुशर्रफ यांच्याविरोधात सध्या देशद्रोहाचा खटला सुरु आहे. आज सकाळी त्यांच्या मोटारींचा ताफा रस्त्यावरून जाण्याच्या थोडाच वेळ आधी येथे शक्तिशाली बॉंबस्फोट झाला. या बॉम्बस्फोटातून मुशर्रफ थोडक्यात बचावले आहेत.

मुशर्रफ यांच्यावर हल्ला होण्याची दाट शक्‍यता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.

close