लोणावळ्यात हुक्कापार्टीत मुंबईतील 46 विद्यार्थी ताब्यात

April 3, 2014 9:11 AM0 commentsViews: 1878

hookah-smoke03 एप्रिल :  लोणावळ्यातील एका बंगल्यात सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर लोणावळा पोलिसांनी छापा टाकून मुंबईतील ४६ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. हुक्कापार्टी, बेकायदेशीर मद्यप्राशन, अश्लील नृत्य केल्याच्या आरोपाखाली या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

गोल्ड व्हॅली परिसरातील एका बंगल्यात मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात लॉचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टील २६ तरुणी आणि २० तरुण सहभागी झाले होते.

पार्टीत जोरजोरात गाणी लावून मद्यधूंद अवस्थेत अश्लील नृत्य सुरु असल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी पार्टीवर धाड टाकून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

close