बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद : जयदेव ठाकरेंची याचिका फेटाळली

April 3, 2014 2:25 PM0 commentsViews: 1712

jaidev and udhav03 एप्रिल :  बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रातल्या वादासंदर्भात आज सेशन्स कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. जयदेव ठाकरेंचं नोटीस ऑफ मोशन कोर्टाने फेटाळली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी तयार करून ठेवलेल्या मृत्यूपत्रावरून ठाकरे कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहे.

या मृत्यूपत्राबाबत उद्धव ठाकरे यांनी कॅवेट दाखल केलं होतं. त्याला उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. एवढंच नाही तर बाळासाहेबांच्या संपत्तीबाबत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेत बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत संशय व्यक्त केला होता. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

close