कसाबने केली कोर्टाकडे वकिलाची मागणी

March 23, 2009 8:57 AM0 commentsViews: 2

23 मार्च 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाबच्या खटल्याचं कामकाज सुरु झालं असून कसाबनं आज कोर्टाकडे वकिलाची मागणी केली. 'मी पाकिस्तानातील फरिदकोटचा निवासी आहे',अशी कबुली कसाबने व्हिडिओ कॉन्फरसपुढे दिली. खटल्याची सुनावणी सुरू असून वकिलाबाबतची कागदपत्रं सादर करण्यासाठी कसाबला हायकोर्टाकडून मुदत देण्यात आली आहे. याबाबत निर्णय होईपर्यंत आर्थर जेलच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

close