अखेर तिढा सुटला : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये 26 – 22 वर एकमत

March 23, 2009 9:03 AM0 commentsViews: 4

23 मार्च काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला आगामी लोकसभा निवडणुकीतला जागा वाटपाचा तिढा अखेरीस सुटला आहे. दोन्ही पक्षांचं 26 – 22 वर एकमत झालं आहे. आज दुपारी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी ए.के. ऍन्टोनी यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन या जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाला आहे. काँग्रेसच्या वाट्याला 26 तर राष्ट्रवादीला 22 जागा आल्या आहेत.काँग्रसेच्या जागा : धुळे , अकोला, वर्धा, रामटेक नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, औरंगाबाद, पालघर, भिवंडी, मुंबई नॉर्थ, मुबई सेंट्रल. साउथ सेंट्रल. रायगड, पुणे, शिर्डी, लातूर, सोलापूर, रत्नागिरी.राष्ट्रवादीच्या जागा : जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा गोंदिया, हिंगोली, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पूर्व, मावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले.

close