सागर मेघेंच्या गाडीतून पावणे पाच लाखांची रोकड जप्त

April 3, 2014 3:03 PM0 commentsViews: 1776

sagar meghe_vardha03 एप्रिल : निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सत्ताबाजारही चांगलाच तापलाय. वर्ध्याचे काँग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांच्या गाडीतून पावणे पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहेत.

दत्तापूर पोलिसांनी याप्रकरणी सागर मेघेंसह चार जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केलाय. ही गाडी अमरावतीतील धामणगावचे तालुका अध्यक्ष मोहन सिंघवींची आहे. त्यामुळे पोलिसांनी मोहन सिंघवी, प्रशांत घनतेवार, राज पुरोहित यांना ताब्यात घेतलं आणि रात्री उशिरा जामिनावर सोडूनही दिलं.

दरम्यान, उमेदवार सागर मेघे हे काँग्रेसचे खासदार दत्ता मेघेंचे सुपुत्र असल्यानं पोलिसांवर मात्र चांगलाच दबाव असल्याचं जाणवलं. शिवाय पोलिसांनी रोख रकमेचे फोटो घेण्यास तसंच कॅमेरासमोर बोलायला स्पष्ट नकार दिला.

close