भाजपचा जाहीरनामा 7 एप्रिलच्या मुहूर्तावर

April 3, 2014 6:05 PM0 commentsViews: 480

bjp_manifesto03 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मुहूर्त सापडलाय. भाजप आपला निवडणूक जाहीरनामा 7 एप्रिलला प्रसिद्ध करणार आहे. पण याच दिवशी मतदानाचा पहिला टप्पा आहे.

दुसरीकडे भाजप नेते मुरली मनोहर जोशींनी तयार केलेला मसुदा आणि नरेंद्र मोदींचे मुद्दे यामध्ये मतभेद असल्यानं जाहीरनाम्याला उशीर होत असल्याचं कळतंय. शेती आणि उद्योगक्षेत्रात खाजगी गुंतवणूकदारांचा पाठिंबा मोदींना हवा आहे. तर मुरली मनोहर जोशींना स्वदेशी मॉडेलनुसार जाहीरनामा हवा आहे.

भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत मांडण्यात आलेलं भाजपच्या व्हिजन डॉक्यमुेंटचाही समावेश जाहीरनाम्यात असावा असाही मोदींचा आग्रह आहे. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हायला उशीर लागतोय. हा उशीर का होतोय याची कारणं भाजपमधल्या गटबाजीत दडली आहे.

जाहीरनाम्याला उशीर का ?

  • - मोदींच्या गटाचा शेवटच्या क्षणापर्यंत बदल करण्याचा आग्रह
  • - मुरलीमनोहर जोशी हे जाहीरनाम्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
  • - पण मसुद्यात मोदी गटानं सुचवले बदल
  • - 100 नवी शहरं उभारण्याच्या वचनासाठी मोदी आग्रही
  • - प्रत्येक राज्यात उत्कृष्ट दर्जाची विद्यापीठं उभारण्याच्या वचनासाठी मोदी आग्रही
  • - फाईव्ह ‘टी’च्या समावेशाचाही मोदींचा आग्रह
  • - टॅलेंट, ट्रॅडिशन, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी हे पाच ‘टी’