मोदींचे पोस्टर फाडणार्‍या काँग्रेस उमेदवाराला अटक

April 3, 2014 7:07 PM0 commentsViews: 814

62baroda modi_postars03 एप्रिल : बडोद्याच्या लोकसभेच्या रणसंग्रमात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार मधुसुदन मिस्त्री यांना मोदींचे पोस्टर फाडण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे.

मिस्त्रींसह 100 काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. पहिल्यांदा चौकशीसाठी मिस्त्री यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. प्रचारासाठी बडोद्यामध्ये ठिकठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या प्रचारासाठी पोस्टर लावण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे मिस्त्री यांनी थेट मोदींचे पोस्टर हटवण्याची मोहिम हाती घेतली.

त्यांच्या कार्यकर्त्यांनी बडोद्यातील मोदींचे पोस्टर हटवण्यास सुरूवात केली. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मिस्त्रींसह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र आपल्यावर झालेली कारवाईही चुकीची असून याविरोधात आपण आवाज उठवणार असल्यांचं मिस्त्री यांनी सांगितलं.

close