फिल्मी फ्रायडे

April 3, 2014 10:34 PM0 commentsViews: 673

03 एप्रिल : एप्रिल महिन्याचा पहिला वीकेण्ड आणि या वीकेण्डला सिनेमांचे ऑप्शन्सही चांगले आहेत. स्पेशल चाइल्डवरच्या ‘यलो’ या मराठी सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. गौरी गाडगीळवर बेतलेल्या या सिनेमात गौरीनंच काम केलंय. मृणाल कुलकर्णी, हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये अशी कलाकारांची तगडी फौजही आहे. महेश लिमयेचं पहिलंच दिग्दर्शन आहे. रितेश देशमुखची निर्मिती असल्यानं बॉलिवुडच्या हस्तींचंही लक्ष या सिनेमानं वेधून घेतलंय. याशिवाय बॉलिवुडचा ‘मै तेरा हिरो’ही आहे. डेव्हिड धवन फॅन्ससाठी ही खास ट्रीट असेल. सिनेमात वरुण धवन, नर्गिस फाक्री आणि एलियाना डिक्रूझ यांच्या भूमिका आहेत. याशिवाय दुष्काळावर भाष्य करणारा ‘जल’ हा हिंदी सिनेमाही पाहता येईल.

close