कसाबच्या खटल्याची पुढील सुनावणी 30 मार्चला

March 24, 2009 6:20 AM0 commentsViews: 6

24 मार्च, मुंबई सुधाकर कांबळेमुंबईवर हल्ला करून संपूर्ण देशाला हादरवणा-या 26 / 11 प्रकरणातला एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसबा याने तो पाकिस्तानी असल्याचं कबूल केलं आहे. आतापर्यंत मला पाकिस्तानीच वकील हवा, असा तगादा लावणा-या दहशतवादी कसाबने सोमवारी त्याची बाजू लढवण्यासाठी तयार असलेला किंवा सरकारने नेमलेला वकीलही चालेल, असं सांगून वकिलाबद्दलची समस्याही सोडवली आहे. सुनावणी दरम्यान न्या. एम. एल. ताहिलयानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना त्याच्या चेह-यावर अजिबात पश्चात्तापाची भावना दिसत नव्हती. न्यायालयाने या प्रकरणाची पुढची सुनावणी 30 मार्चला होईल असं सांगितलं आहे. कसाबच्या खटल्याचं कामकाज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होत आहे. जोपर्यंत कोर्टापुढे ठोस पुरावे सादर होत नाहीत तोपर्यंत हे व्हिडिओ चित्रिकरण दाखवू नये असंही कोर्टाने सांगितलं आहे.

close