‘जनलोकपाल’ आणणार, ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध

April 3, 2014 10:43 PM0 commentsViews: 271

aap_manifesto03 एप्रिल : आम आदमी पार्टीने आज (गुरूवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आलो तर भ्रष्टाचाविरोधी जनलोकपाल विधेयक मंजूर करू, असं प्रमुख आश्वासन त्यात देण्यात आलंय.

याशिवाय समलिंगी संबंध कायदेशीर करणं, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी स्वराज मॉडेल राबवणं, अशी अनेक आश्वासन त्यात देण्यात आली आहे. राजकीय नेत्यांना वयोमर्यादा घालणं

आणि निवडणुकीसाठी उमेदवाराचं वय 25 वरून 21 करणं, यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आपच्या जाहीरनाम्यात म्हटलंय. आम आदमी पार्टी उद्योजकांविरोधात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

close