‘आमदारकी नको, मुख्यमंत्री म्हणून काम करायला आवडेल’

April 3, 2014 11:03 PM0 commentsViews: 6826

raj_news_cm03 एप्रिल : राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करायला आवडेल, आमदार म्हणून नाही. एका मर्यादित मतदारसंघासाठी निवडणूक लढवायचं हे आपल्या दृष्टीकोनात बसत नाही अख्खा महाराष्ट्र हा मतदारसंघ असला पाहिजे अशी इच्छा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

तसंच रोज रोज तेच बोलायला कंटाळा येतो जे काही बोलायचं होतं ते डोंबिवलीच्या सभेत बोलो. आता समोरून जर आलं तर बोलेनच असंही राज यांनी स्पष्ट करत वाकयुद्ध सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

गोरेगाव इथं राज यांची भव्य सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा स्तुतीसुमनं उधळली. नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर बसतील ही काळा दगडावरची रेघ आहे असं मतही राज यांनी व्यक्त केलं.

====================================================================

संबंधित बातम्या

close