‘बाबरी मशीद विध्वंस हा पूर्वनियोजित कट’ : कोब्रा पोस्ट

April 4, 2014 11:27 AM4 commentsViews: 2664

Image img_107222_babri_240x180.jpg04 एप्रिल :  कोब्रापोस्ट या वेबसाईटनं 1992 सालच्या बाबरीमशीदीच्या विध्वंसावर स्टिंग ऑपरेशन केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या गौप्यस्फोटात लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान नरसिंहराव, कल्याण सिंह आणि बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. बाबरी मशीद ही तत्कालीन रागातून पाडली गेली नसून बाबरी पाडण्याचा कट रचला गेला होता असा आरोप कोब्रापोस्टनं केलाय.

ऑपरेशन जन्मभूमी नावानं केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना यांनीच बाबरी पाडण्याचा कट केल्याचा आरोप आहे. शिवसेना आणि विहिंप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मशीद पाडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.बाबरी पाडण्याबाबतची शपथ भाजपच्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या नेत्यांच्या उपस्थितीत देण्यात आली. म्हणजेच अडवाणींना बाबरी पाडण्याबाबतची पूर्वकल्पना होती. विहिंपचे अशोक सिंघल, गिरीराज किशोर हे नेतेही शपथ देताना हजर होते. शिवसेनेनं ‘प्रतापसेना’ या नावानं कार्यकर्त्यांची बांधणी केली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही बाबरी मशीद पाडण्याची पूर्ण कल्पना होती. याबाबतची गुप्त बैठकही संघाचे एच व्ही शेषाद्री उपस्थित होते. शिवसेनेनंही याबाबत गुप्त चर्चा केल्या ज्यात सतीश प्रधान, आनंद दिघे, मोरेश्वर सावे सहभागी होते. इतकंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना याबाबतची पूर्वकल्पना दिली होती. शिवसेनेनं डायनांमाईटनं बाबरी उडवण्याची योजनाही बनवली होती.

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनाही बाबरी पाडण्याच्या कटाची पूर्ण माहिती होती. 5 डिसेंबर 1992 च्या दिवशीच त्यांना दुसर्‍या दिवशी बाबरी मशीद पाडली जाणार याची पूर्ण कल्पना दिली गेली होती तरीही कल्याण सिंग यांनी काहीच सावधगिरी बाळगली नाही, असा आरोप कोब्रापोस्टनं केलाय.

इतकंच नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना या कटाची पूर्ण कल्पना होती. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या स्टिंग ऑपरेशनमुळे भाजप आणि शिवसेना चांगलेच अडचणीत आलीये.

दरम्यान, या स्टींगविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या स्टींगमुळे देशातील वातावरण बिघडू शकते. त्यामुळे स्टींगवर बंदी घालण्याची मागणी भाजपने केली आहे.

बाबरी मशीद प्रकरणी कोब्रा पोस्टचं स्टिंग ऑपरेशन

 • बाबरी मशीद प्रकरणात शिवसेना आणि विहिंपचा हात
 • बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित
 • याबद्दल कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
 • अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत बाबरी मशीद पाडण्याची शपथ
 • उ. प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंगांना एक दिवस आधी कल्पना दिली
 • Krishna Maselkar

  tumhala kay parat dangal majwaychi aahe he asle sagal niwadnukichya tondawar kasahala ukrun kadhtay

 • Vikram

  nivadnuk jawal aalyavar he post ka prasiddha jhali. he suddha purvaniyojit aahe ka?

 • http://batman-news.com BHARTIY

  This is sheer nonsense. Today really it has no meaning who has demolished the BABRI.
  Todays problems are different & we as a generation wants the security for jobs, peace & prosperity . Only NAMO can provide that. Neither SONIA nor RAHUL…..

 • uday Marbate

  yar kay tech tech mandir masjid kuni padali ka padali
  thakale nahit ka be?
  kantala aala yar he kay life long purnar ki kay?
  dusar kahi bola ho dusarya news dya pan he aata band kar /
  waitagaloy yar ya sarwala.

close