मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाचा छापा

April 4, 2014 1:28 PM4 commentsViews: 1401

mutewar04 एप्रिल :  नागपुरातील काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवारांच्या ‘ग्रेट नागरोड’च्या ऑफिसवर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी आज छापा टाकला आहे. या कार्यालयातून पैसे वाटले जात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती . त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी काही वस्तू आणि लॉकर सील केले आहे.

दरम्यान, नितिन गडकरी यांच्या इशार्‍यावरून हा छापा टाकल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला आहे. अधिकारीच पैसे घेऊन आले होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ज्या ठिकानी छापा टाकला ते माझ्या मुलाचे व्यवसायचे ऑफिस असून निवडणूकीशी त्याचा संबंध नाही असंही ते म्हणाले. रात्री सील केलेलं लॉकर खुलं करून शहानिशा करावी अशी मागणीही त्यांनी केली.

 • rahulil.com

  gap re tu.. jhopadpttya paise vatun jinkat aala aaj paryant

 • http://batman-news.com BHARTIY

  Paise vatun jinkane he yanche etkya varshanche udyog. Congress is heading towards a HUGE DEFEAT.

 • Ajay Pachghare

  विलासराव आपण आपल्या विकासासाठी झोपडपट्टी निर्माण केल्या …..व आपल्या नावानुरूप स्वताचा विकास केला ……

 • Praful Wadbudhe

  De 2 thewun Lagech…harmkhor kuthla…..

close