सेमीफायनलसाठी भारत-द.आफ्रिका आमने-सामने

April 4, 2014 4:30 PM0 commentsViews: 1186

ind_vs_afrika04 एप्रिल : टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलसाठी भारत आणि साऊथ आफ्रिकेत मुकाबला रंगणार आहे. ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारत आपल्या स्पिनची जादू चालवणार असल्याचं मानलं जातंय. या मॅचमध्ये आर.आश्विन, रवींद्र जाडेजा आणि अमीत मिश्राला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत एकही मॅच हरलेला नाही.

परदेश दौर्‍यात सपाटून मार खावा लागलेल्या टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये दणक्यात सुरुवात केली. पहिल्याच मॅचमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत टीम इंडियानं विजयाचा नारळ फोडला. त्यानंतर विंडीज, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियावर मात करत सेमी फायनलमध्ये भारताने आपली जागा निश्चित केली.

तर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात तितकी चांगली झाली नाही. पहिल्याच मॅचमध्ये लंकेनं आफ्रिकेचा 5 रन्सनी पराभव केला. पण त्यानंतर न्यूझीलंड, हॉलंड आणि इंग्लंडचा पराभव करत आफ्रिकेनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.पण ही मॅच दोन्ही टीम्ससाठी तितकीशी सोपी नसेल. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांत टीम इंडियाची कामगिरी नेहमीच चांगली झालीये. तर दक्षिण आफ्रिका नेहमीच धोकादायक टीम ठरली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये बाजी मारत श्रीलंकेला फायनलमध्ये कोण आव्हान देतंय हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील प्रवास

भारत वि. पाकिस्तान
- भारताचा पाकिस्तानवर 7 विकेटनं विजय

भारत वि. वेस्ट इंडिज
- भारताचा विंडीजवर 7 विकेटनं विजय

भारत वि. बांगलादेश
- भारताचा बांगलादेशवर 8 विकेटनं विजय

भारत वि. ऑस्ट्रेलिया
- भारताचा ऑस्ट्रेलियावर 73 रन्सनी विजय
 

close