बटाटेवडे, सूपने राज्याचे प्रश्न सुटणार का?-अजित पवार

April 4, 2014 6:20 PM2 commentsViews: 3810

Image ajit_pawar_on_raj_52_300x255.jpg04 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या वाकयुद्धात आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतलीय. कोण कुणाचे बटाटेवडे काढत आहे. तर कुणी सूप काढत आहे. पण यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार आहे का ? महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहे का? असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय.

तसंच मतभेद असतात पण घरातले मतभेद हे घरातच ठेवायचे असता लोकांच्या समोर चव्हाट्यावर आणण्याचे नसता असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला.  त्याचबरोबर ठाकरेंच्या भाषणबाजीचा तरूणांनी नीट विचार केला पाहिजे, तरुणांची माथी भडकावणारी भाषण केली की सगळं आपल्याला मिळालं हे मनातून काढून टाका असा टोलाही पवारांनी लगावला.

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यावरुन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. आज भुजबळांनी आपला उमेदवारी अर्ज दाखलं केला. यावेळी पवारांनी नाशिककरांची मनधरणी करत भुजबळांना महाराष्ट्रातून जाऊ देणार नाही असं सांगितलं. भुजबळ जरी लोकसभेची लढाई जिंकून दिल्लीला जरी गेले तरी मुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत राहिलं. भुजबळ आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहे राष्ट्रवादी त्यांच्याकडे तसंच पाहते असं पवारांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे जुन्नरमध्ये प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही मनसे-सेनेच्या राड्याचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

नमो आणि गोमूंना मानसोपचाराची गरज – आर.आर.पाटील

साधा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी नीट जाऊ शकत नाही ते देश कसे चालू शकतील असा सवाल आबांनी उपस्थित केला. तसंच आज देशात म्हणे नरेंद्र मोदींची हवा आहे असं म्हटलं जात पण तसं काही नसून देशात नमो आणि राज्यात गोमू (गोपीनाथ मुंडे ) यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे असा टोलाही आबांनी लगावला. सेनेनं शिवबंधनसाठी लोखंडी साखळ्या बांधल्या तरी लोक थांबायला तयार नाही अशी अवस्था सेनेची झालीय असं सांगत ठाकरे बंधूंमध्ये वादावरही आबांनी टीका केली. भाजप हा विश्वासघातकी पक्ष असून दोन्ही भावांमध्ये विस्तव लावण्याचं काम भाजप करतोय अशी टीकाही आर.आर.पाटलांनी केली.

  • Dilip Kadam

    दोन्ही भावांमध्ये विस्तव लावण्याचं काम भाजप करतोय ………….nav ghya saheb …………te manje gadkari

  • Vijay

    आर आर पाटिल यानि पाहिले स्वताचे कर्तुत्व दाखवा वे इतके वर्ष फ़क्त सगीत
    खुर्ची खेलात आणि Maharashtra ची वाट लवली अत्ता तरी कही कार्य करा

close