शक्तीप्रदर्शन करत दिग्गज मैदानात दाखल

April 4, 2014 6:01 PM0 commentsViews: 735

04 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गज उमेदवार आज खर्‍या अर्थाने रिंगणात उतले. नाशिक,मुंबईमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. नाशिकमध्ये आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि आप या चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्या आधी शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅलीही काढली. शिवसेनेचे हेमंत गोडसे, मनसेचे प्रदीप पवार, आपचे विजय पांढरे यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला. पण या शक्तीप्रदर्शनामुळे शहारतले प्रमुख रस्ते बंद होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तर मुंबईमध्ये उत्तर पूर्वचे महायुतीचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी आज लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी मुलुंडमध्ये पदयात्रा काढली आज राष्ट्रवादीतर्फे संजय दिना पाटील यांनीही आपला अर्ज दाखल केला.

close