उत्तमसिंग पवार नरमले,नितीन पाटील यांची उमेदवारी कायम

April 4, 2014 9:11 PM0 commentsViews: 1112

uttamsingh_pawar_aurangabad04 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांच्या उमेदवारीवरुन नाराज असलेले ज्येष्ठ नेते उत्तमसिंग पवार बंडाच्या पवित्र्यात होते मात्र वरिष्ठांसोबत चर्चेनंतर त्यांनी तलवारम्यान केलंय. त्यामुळे जीव भांड्यात पडला असून आता नितीन पाटील यांची उमेदवारी कायम राहणार आहे.

नितीन पाटील यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले उत्तमसिंग पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतलीय. आपण पक्षवाढीसाठी काम करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

औरंगाबादमधून उमेदवारी देण्यावरुन काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली. विशेष म्हणजे औरंगाबादमधून खासदारकीसाठी तीन वेळा हॅटट्रिक साधणार शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासासाठी काँग्रेसने अखेरच्या क्षणी कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेसचे नेते माजी खासदार उत्तमसिंग पवार कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी पक्षाविरोधात थेट बंड पुकारला. पवार यांच्या नाराजीमुळे औरंगाबादचा उमेदवार बदलला जाईल अशी शक्यताही व्यक्त होत होती. पण उत्तमसिंग पवार यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. अखेर या चर्चेनंतर उत्तमसिंग यांनी आपली नाराजी दूर झाल्याचं सांगून पक्षाच्या कामाला लागणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता या चर्चेवर पडदा पडलाय.

close