द.आफ्रिकेचा धुव्वा, भारत फायनलमध्ये

April 4, 2014 10:15 PM0 commentsViews: 1461

virat_kohali _new04 एप्रिल : 04 एप्रिल : दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने सहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवलाय. विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीने विजय खेचून आणला. रविवारी श्रीलंकासोबत भारताची फायनल रंगणार आहे.

टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 173 रन्सचं बलाढ्य टार्गेट ठेवलं होतं. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारनं क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पण त्यानंतर हाशिम आमलानं 22, कॅप्टन फॉप ड्यु प्लेसीने 58 तर जे पी ड्युमिनीने 45 रन्स करत रन्सचा डोंगर उभारला. भारतातर्फे आर अश्विनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

पण भारताची सुरुवातच धडाक्यात झाली. ओपनर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं कमालीची फटकेबाजी केली. रोहितने 13 बॉल्समध्ये 4 फोर आणि 1 सिक्स ठोकत 24 रन्स, केले. तर रहाणेने 30 बॉल्समध्ये 2 फोर आणि 1 सिक्स ठोकत 32 रन्स केले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने मात्र कमालीची इनिंग पेश केली. कोहलीने सुरेश रैनाच्या साथीनं टीम इंडियाला विजयपथावर नेलं. कोहलीने 44 बॉल्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्स मारत एक विराट इनिंग केली. तर रैनानंही 10 बॉल्समध्ये 3 फोर आणि 1 सिक्स ठोकत 21 रन केले. त्याअगोदर युवराज सिंगनंही 18 रन्स करत कोहलीला चांगली साथ दिली. या तुफान परफॉर्मन्सच्या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट गमावत 176 रन्स केले आणि फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. रविवारी रंगणार्‍या फायनलमध्ये भारताची गाठ पडेल ती श्रीलंकेशी. त्यामुळे या मेगा फायनलमध्ये कोण बाजी मारत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

 

close