एनडीएची आगेकूच, यूपीएची पीछेहाट

April 4, 2014 11:14 PM1 commentViews: 2877

5march_election_tracker_04 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राम चांगलाच रंगलाय. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, मोदी विरुद्ध केजरीवाल, मोदी विरुद्ध सोनिया गांधी किंवा भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामनाच रंगला आहे. पण सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात द्यायच्या हे ठरवण्याचं काम मतदारराजाच्या हातात.

त्यामुळेच आज जर निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कुणाला असेल यासाठी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच सीएसडीसीने आयबीएन नेटवर्क आणि द वीकसाठी सर्व्हे केलाय. आज जर निवडणुका झाल्या तर एनडीएला 234 ते 246 जागा मिळतील तर यूपीएला 111 ते 123 जागा मिळतील. पक्षानिहाय कौल पाहिला तर भाजपला 206 ते 218 जागा मिळतील आणि काँग्रेसला 94 ते 106 जागांवर समाधान मानावे लागेल.

त्यामुळे बहुमतासाठीचा 272 चा आकडा गाठण्यासाठी एनडीएची दमछाक होईल. बहुमतासाठी इतर पक्षांशी मोट बांधावी लागणार आहे. बहुमतासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडेच पहिलं साकडं घालावं लागणार आहे. ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक 23 ते 29 जागा मिळतील. त्यापाठोपाठ अण्णा द्रमुकला 15 ते 21 जागा, डाव्या आघाडीला 14 ते 20, समाजवादी पक्षाला 11 ते 17, बहुजन समाज पक्षाला 10 ते 16 जागा मिळतील. लोकसभेच्या आखाड्यात पहिल्यांदाच उतरलेली आम आदमी पार्टी 4 ते 8 जागा मिळवत आपलं खातं उघडेल.

मतांच्या टक्केवारीचं गणित

मतांची टक्केवारी पाहिली तर 2009 च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची टक्केवारी 28.6 टक्के होती ती आता 25 टक्क्यांवर आलीय. काँग्रेस घटक पक्षांची टक्केवारी अगोदर 4 टक्के होती ती आता 3 टक्क्यांवर आलीय. भाजपची टक्केवारी पाहिली तर 2009 च्या निवडणुकीच्या वेळी 18.8 टक्के होती ती आता 35 टक्के इतकी आहे. तर भाजपच्या घटक पक्षांची टक्केवारी 4.8 टक्के होती ती आता 3 टक्के इतकी आहे. बसपाची टक्केवारी 6.2 टक्के होती ती आता 4 टक्क्यांवर आलीय. डाव्या आघाडीची 7.6 टक्के होती ती 4 टक्के आहे. सपाची टक्केवारी 3.4 इतकी होती ती आता 4 वर पोहचली आहे. आपची टक्केवारी 3 टक्के इतकी आहे.

यूपीए सरकारला नकारघंटा

तब्बल दोन टर्म सत्ता उभोगणार्‍या यूपीए सरकारला आता जनतेनं नकारघंटा दिलाय. यूपीए सरकारच्या कामावर फक्त 13 टक्के जनताच समाधानी आहे. यूपीएला पुन्हा संधी द्यावी का ? असा सवाल केला 53 टक्के जनतेनं स्पष्ट नकार दिलाय. जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरात पर्यंत जनतेचा कौल घेतला असता. उत्तर भारतातून 55 टक्के जनतेनं नकार दिलाय. तर दक्षिण भारतातून 52 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर मध्य भारतातून 49 टक्के, पश्चिम भारतातून 57 टक्के, आणि पूर्व भारतातून 48 टक्के लोकांनी नकार दिलाय.

=========================================================
अंदाजे जागा – लोकसभा – एकूण जागा 543
=========================================================
एनडीए                         234-246
भाजप                           206-218
=========================================================
यूपीए                             111-123
काँग्रेस                           94-106
=========================================================
भाजप                            206-218
काँग्रेस                           94-106
=========================================================
तृणमूल काँग्रेस             23-29
अण्णा द्रमुक                  15-21
डावी आघाडी                 14-20
टीडीपी                            13-19
समाजवादी पक्ष            11-17
द्रमुक+                           10-16
बिजू जनता दल            10-16
बहुजन समाज पक्ष       10-16
YSR काँग्रेस                 09-15
तेलंगणा राष्ट्र समिती    4-8
आम आदमी पक्ष            4-8
=========================================================
 राष्ट्रीय चित्र
अंदाजे जागा प.बंगाल (42 जागा)
तृणमूल काँग्रेस        23-29
डावी आघाडी        7-13
काँग्रेस            4-7
भाजप            0-1

=========================================================

बिहार (40 जागा)
एनडीए    21-29
यूपीए    7-13
जेडीयू    2-5
इतर        0-3
=========================================================

ओडिशा (21 जागा)
बीजेडी        10-16
भाजप        3-7
काँग्रेस        0-4
इतर            0-2

=========================================================

आंध्र प्रदेश  94-106   (42 जागा)
काँग्रेस        4-8
टीडीपी        13-19
टीआरएस        4-8
YSR काँग्रेस    9-15

=========================================================

कर्नाटक (28 जागा)
भाजप    13
काँग्रेस    12-18
इतर        1-4

=========================================================

तामिळनाडू(39 जागा)
द्रमुक+        10-16
अण्णा द्रमुक    15-21
काँग्रेस        0
भाजप+        6-10

=========================================================

केरळ (20 जागा)
UDF    11-17
LDF    4-8

=========================================================

महाराष्ट्र (48 जागा)
महायुती    24-30
आघाडी    16-22
इतर+    1-3    
इतर+- = आप, मनसेसह इतर पक्ष

=========================================================

गुजरात  
इतर+- (26 जागा)
भाजप    20-26
काँग्रेस    0-4
इतर        0-2

=========================================================

मध्य प्रदेश (29 जागा)
भाजप    24-28
काँग्रेस    1-5   

=========================================================

उत्तर प्रदेश (80 जागा)
भाजप+            42-50
काँग्रेस+            4-8
समाजवादी—– पक्ष        11-17
बहुजन समाज पक्ष    10-16
इतर                0-2

=========================================================

दिल्ली (7 जागा)
काँग्रेस    0-1
भाजप    3-4
आप        2-3

=========================================================

राजस्थान ( 25 जागा)
भाजप    21-25
काँग्रेस    0-2
इतर+    0-2
इतर+—— = बसपा, आपसह इतर

=========================================================

 • umesh jadhav

  ओपिनिअन पोलच्या बाबत असं
  म्हंटलं जातं की हे मतदारांचं मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी काही संस्था आणि
  माध्यम जाणीवपूर्वक अशी माहिती गोळा करतात आणि प्रसिद्ध करतात.पीटर हिचेंस याने
  त्याच्या द ब्रोकन कंपास ह्या पुस्तकात असं मत मांडलंय की opinion
  polls are a device for influencing
  public opinion आणि हे कसं होतं त्यासाठी बँड वॅगन
  आणि अंडर डॉग इफेक्ट तसेच स्ट्रटेजिक किंवा टॅक्टिकल वोटिंग अशा काही थीअरीज
  मांडल्यात.बँड वॅगन इफेक्ट अशा वेळी घडतो जेंव्हा एखादा पोल असं दर्शवत असतो की
  अमका उमेदवार निवडणुकीत हमखास जिंकणारच आहे तेंव्हा ते एक प्रकारे असं सूचित
  करण्यासारखं असतं की मतदानाच्या दिवशी मतदारांनी हरणाऱ्या उमेदवारापेक्षा
  जिंकणाऱ्यालाच मतदान करावं किंवा अशा परिस्थितीत मतदार हा नेहमीच जिंकून येणाऱ्या
  उमेदवाराच्याच पाठीशी उभा राहतो कारण त्याला आगाऊच असं माहित असतं की अमका उमेदवारच
  जिंकून येणार आहे.अंडर डॉग इफेक्ट याच्या अगदी उलट असतो ज्या मध्ये मतदार सहानुभूतीने
  हरणाऱ्या उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान करतात.पण असं अगदी क्वचितच घडतं.स्ट्रटेजिक
  किंवा टॅक्टिकल वोटिंग मध्ये मतदार हा एखाद्या उमेदवाराचा सहानुभूतीने विचार करून
  किंवा त्या पक्षाची विचारधारा किंवा अजेंडा लक्षात घेऊन मतदान करत नसून जर एखाद्या
  पक्षाचं सरकार येण्याची शक्यता जास्त असेल तर तो त्या सरकार येणाऱ्या पक्षालाच
  आपलं मत देतो.वरील ओपिनिअन पोल मध्ये NDA बहुमताच्या अगदी जवळ दाखवलं आहे अगदी काही जागांचीच त्यांना
  आवश्यकता आहे.प्रत्यक्ष मतदाना नंतर जर त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं तर तो बँड
  वॅगन इफेक्ट किंवा स्ट्रटेजिक किंवा टॅक्टिकल वोटिंगचा परिणाम समजावा म्हणजेच OPINION
  POLLS ARE A DEVICE FOR INFLUENCING PUBLIC OPINION हे पीटर हिचेंसचं
  मत अगदी तंतोतंत खरं आहे असं मानावं लागेल.

close