बदला घेण्यासाठी मत द्या -अमित शाह

April 5, 2014 4:07 PM0 commentsViews: 1339

346_amit shah05 एप्रिल : आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे लाठी काठ्या-गोळ्यांची ही वेळ नसून आता निवडणुकीत बदला घेण्याची ही संधी आलीय, मोगलाच्या जमान्यात तलवारीने बदला घेतला जायचा पण आता बटन दाबून बदला पूर्ण करायचाय त्यांनंतर त्यांची जागा दाखवू असं वादग्रस्त व्यक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशाचे प्रभारी अमित शाह यांनी केलंय.

दंगलग्रस्त मुझफ्फरनगरमध्ये एका सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. अमित शाह हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आहे. शाह यांच्या वक्तव्यावर मात्र काँग्रेसनं आक्षेप घेतलाय.

काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. उत्तरप्रदेशात अमित शाह यांच्या प्रचारसभांवर बंदी घालावी, अशी मागणीही काँग्रेसनं केलीय. दुसरीकडे, राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनीही काँग्रेसच्या इम्रान मसूद यांच्या वादग्रस्त विधानाला आक्रमक प्रत्युत्तर दिलंय. कोण कुणाचे तुकडे करतं, हे निवडणुकीनंतरच कळेल, असं राजे यांनी म्हटलंय.

close