गांधीनगरच्या वादानंतर अडवाणी-मोदींनी दाखवली एकजूट

April 5, 2014 3:20 PM0 commentsViews: 669

90_advani_modi05 एप्रिल : मतदानासाठी दोन दिवस राहिलेले असताना भाजपच्या दिग्गजांनी गुजरातमध्ये एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज आपला लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला.

पण उमेदवारीवरुन मोठा नाराजी नाट्यानंतर अडवाणी गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास तयार झाले होते. अडवाणींनी नमतं घेत गांधीनगरमधून लढणार असल्याचं स्पष्ट करून टाकलं. त्यानंतर आज अडवाणी अर्ज भरण्यासाठी आले असता खुद्ध भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीसोबत होते.

त्याअगोदर एका छोटेखानी मार्गदर्शन सभेत मोदी आणि अडवाणी एकाच स्टेजवर आलेत. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत अडवाणींनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. भोपाळमधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, या चर्चेचंही अडवाणींनी यावेळी खंडन केलं. मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच देशाला काँग्रेसमुक्त करायचंय. काँग्रेस कुठल्याच राज्यात दुहेरी संख्या गाठणार नाही. अनेक राज्यांत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. गुजरातमध्ये भाजपच्या 28 जागा येतील आणि अडवाणींना विक्रमी मतांनी जिंकतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

close