सेना संपलीय, बाण तर मीच काढून आणलाय -राणे

April 5, 2014 4:42 PM1 commentViews: 5388

naryan rane on nitish twit05 एप्रिल : शिवसेनेतून 2005 साली येताना धनुष्यातला बाण काढून आणलाय. त्यामुळे शिवसेनेत आता काहीच राहीलं नाही अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली.

हिंगोली लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली.

भारताला जागतिक मंदीतून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाहेर काढले. इथे जर नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर भारत विकायला काढला असता. मोदींनी स्वत:च्या जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करून राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले असा आरोपही राणे यांनी केला. तसंच मराठा आरक्षणाबद्दल वावड्या उठत आहे पण आचारसंहितेमुळे मराठा आरक्षण देता आले नाही. पण निवडणुका संपल्यानंतर जूनपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही राणे यांनी दिलं.

  • Dilip Kadam

    aadarniy rane saheb……………………………. jya gharat vadalat teh ghar todanachi bhasha kartat. jya ghara mule nav milalal (tumich Mana kelat ) …………..tumcha sarkha neta kadun hi bhasha …………padat nahi manala ……………..ek maji mukhaMantra kadun kiva bhavi Mukh Mantra kadun

    thik aahe tumcha patat nasel ……… tar vicharik ladhai lada ……………..pan spavanachi bhasha kasha sathi ……………..

    Shiv senacha ban and vag manaje bala shaheb thakare ………. ….

close