आयपीएल निघालं दक्षिण आफ्रिकेला

March 24, 2009 3:07 PM0 commentsViews: 3

24 मार्चआयपीएल भारताबाहेर भरवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्यानंतर आता त्याचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. आयपीएलचे संचालक ललित मोदी यांची दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाशी बोलणी पूर्ण झाल्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दक्षिण आफ्रिका सरकारनेही याबाबत मदत करण्याचं आश्वासन दिलंय. सुरक्षेच्या कारणावरून भारतात आयपीएल आयोजित करणं अशक्य असल्याने बीसीसीआयने आयपीएल भारताबाहेर घेण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेबरोबरच इंग्लंडचंही नाव या शर्यतीत होतं. पण अखेर दक्षिण आफ्रिकेनंच बाजी मारलीय. दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट हंगाम 9 एप्रिलला संपणार असल्याने तिथल्या क्रिकेट बोर्डानं आयपीएलच्या आयोजनासाठी सुविधा पुरवण्याचं जाहीर केलंय. आयपीएलचा दुसरा हंगाम येत्या 17 एप्रिलपासून दक्षिण आफ्रिकेत सुरु होईल. डर्बन, केपटाऊन, पोर्ट एलिझाबेथ, प्रेटोरिया, जोहान्सबर्ग, आणि ब्लोमफाऊंटेन या सहा मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

close