राजेंद्र गावित उमेदवारी मागे घेण्याची शक्यता

April 5, 2014 4:40 PM0 commentsViews: 3550

rajendra_gavit4405 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेले राजेंद्र गावित माघार घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस हितेंद्र ठाकुर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी राज्याबाबतचा सर्व्हे केला होता. त्यानुसार बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघातून निवडून येवू शकतात असा अहवाल त्यांनी दिला होता. जाधवांना काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची गळ काँग्रेसनं बहुजन विकास आघाडीला घातली होती.

पण बहुजन विकास आघाडी आपल्या मतावर ठाम राहिली. त्यानंतर काँग्रेसने राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली. पण मतांची विभागणी पाहता आता राजेंद्र गावित माघार घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा पाठिंबा बहुजन विकास आघाडीला असेल, अशी सुत्रांची माहिती आहे.

close