खालच्या पातळीवर जाऊन राजना उत्तर देणार नाही -उद्धव

April 5, 2014 8:05 PM2 commentsViews: 3843

567_udhav_thakare_interview05 एप्रिल : राज ठाकरे काय बोलले यावर खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही. मी काही उकडलेली बटाटेवडे पाहिले नाही त्यामुळे हा विषय संपला आहे अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतला सर्वात पहिली मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. उद्धव यांनी सर्वच मुद्यांवर आपली भूमिका मांडत गडकरी,राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.

उद्धव म्हणतात, आता राज ठाकरे मोदींचा प्रचार करत आहे. त्यांच्याकडे चेहरा नाही. आमचे अधिकृत उमेदवार असताना मोदींना पाठिंबा देण्याची गरज काय ? आम्ही जेवतोय ना तुमची घास भरवायची काय गरज ? असा शेलक्या शब्दात टोला उद्धव यांनी राज ठाकरेंना लगावला. मोदींचे गुणागाण आम्ही आताच गात नाहीय. मुळात आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. पण कुणाचं उगाच ‘मोदी के नाम पे’ असं सुरू आहे असा टोलाही उद्धव यांनी राज यांना लगावला. तसंच महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा गडकरींचा प्रयत्न फसला आहे. त्यांनी प्रयत्न केला आहे पण राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही स्पष्ट केलंय त्यामुळे गडकरींचा प्रयत्न फसलाय असंही उद्धव म्हणाले.

 

  • Dilip Kadam

    thanks udhav shaheb…………………aasach samjudar pana kayam theva………

    khalcha patalitil lok khalcha patalitil bhasha kartat.

    tumhi bala sahebanch kam chalu theva ……………vijay tumcha nakki hoil …………..Jai Maharashtra .

  • ARAV

    aadhi khota bolaycha ….mag sarvasarav karaychi………dagabaj………….marathi lokanchya babtit pan tech kela hindutvachya navakhali bhayyansathi UTTARPRADESH DIN sajra kela,biharinsathi lai chana…chhatpooja…….yaaadhi sushma swarajla pathimba ….advaninna pathimba …MAG MODINNA…KHOTARDA

close