नारायण राणे इन्कम टॅक्सवाले -मुंडे

April 5, 2014 9:08 PM0 commentsViews: 1689

05 एप्रिल : नारायण राणे हे इन्कम टॅक्स वाले आहेत अशी टीका भाजपचे नेेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंगोलीमध्ये सभेमध्ये नारायण राणे यांनी मोदींच्या कपड्यांचा खर्च हा 60 हजारांहून जास्त असतो असा आरोप केला होता. त्यावर मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं. तसंच ठाकरे बंधू यांच्यातला वाद हा पक्षवाद नसून आपण त्यात लक्ष घालत नाही असं मुंडेंनी स्पष्ट केलंय. लातूरला झालेल्या कल्पना गिरी हत्येप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही मुंडेंनी आज लातूरला झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

close