गावितांची माघार, जाधवांना काँग्रेसचा ‘हात’

April 5, 2014 9:16 PM0 commentsViews: 1004

rajendra_gavit4405 एप्रिल : काँग्रेसचे पालघर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय.

पालघरमध्ये तिरंगी लढत झाली असती त्यामुळे जातीयवादी शक्तींना याचा फायदा झाला असता त्यामुळे गावित यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलं.

काँग्रेसचे सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री यांनी राज्याबाबतचा सर्व्हे केला होता. त्यानुसार बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघातून निवडून येवू शकतात असा अहवाल त्यांनी दिला होता. जाधवांना काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची गळ काँग्रेसनं बहुजन विकास आघाडीला घातली होती. पण बहुजन विकास आघाडी आपल्या मतावर ठाम राहिली. त्यानंतर काँग्रेसने राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली पण मतांची विभागणी पाहता अखेर राजेंद्र गावितांना उमेदवारी मागे घ्यावी लागली.

close