राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भिवंडीत नाचवल्या चीअर गर्ल्स

March 24, 2009 3:31 PM0 commentsViews: 2

24 मार्च, मुंबईरणधीर कांबळे भिवंडी मानकुली नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.सी. पाटील यांनी मतदार संघ आपल्या पक्षाला सुटेल या लालसेनं क्रिकेट सामने भरवले. त्यात रशियाहून खास आणलेल्या चीअर गर्ल्सही नाचवल्या. आयपीएल मॅचमध्ये चीअर गर्ल्स नाचवाव्यात का ? यावरून बरंच वादळ उठलं होतं. हा निर्णय होईल तेव्हा होईल पण आता आचारसंहिता लागू असतानाच स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये राजकीय नेत्यानं मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीतच रशियन चीअर्स गर्ल्स नाचवल्या. विशेष म्हणजे यासाठी आर.सी. पाटील यांनी पोलिसांकडून परफॉर्मन्स परमीटही घेतलं नव्हतं. त्यामुळे भिवंडी पोलिसांनी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, त्यानिमित्तानं याकडेही लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे.

close