युतीची विचारसरणी समाजात फूट पाडणारी -सोनिया गांधी

April 5, 2014 9:52 PM0 commentsViews: 774

Sonia Gandhi05 एप्रिल : भाजप-शिवसेनेची विचारसरणी ही समाजात फूट पाडणारी आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. तर आपल्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण करत सोनिया गांधींनी कौतुक केलंय.

राष्ट्रवादी समाजामधील एकता टीकवून ठेवण्याचं कार्य करत आहे अशी स्तुतीसुमनं सोनिया गांधी यांनी उधळली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारासाठी आज (शनिवारी) गोंदियामध्ये सभा पार पडली. यासभेला सोनिया गांधी आणि शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून नवरदेव होण्यासाठी निघाले आहे. पण या पद्धतीचा उतावळीपणाला जनता पाठिंबा देणार नाही. देशाचा पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांना अगोदर विश्वास दिला पाहिजे अशी टीका पवारांनी केली. या सभेत प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारासाठी विकसनामा पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं.

close