कागलमध्ये सापडली स्फोटकं, 4 संशयित ताब्यात

April 6, 2014 1:00 PM0 commentsViews: 777

kol bomb06 एप्रिल : ऐन निवडणुकीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात 4 जिवंत बॉम्ब सापडले आहेत. कागल शहराजवळच्या MIDC परीसरातील लक्ष्मी टेक भागात कागल पोलीसांनी ही कारवाई केलीय.

हे चारही बॉम्ब जिलेटिनपासून तयार करण्यात आलेत. पहाटे 3 वाजता हातकणंगलेमधून हे बॉम्ब कागलकडे नेत असताना पोलीसांनी ही कारवाई केलीय. या प्रकरणी पोलीसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय.

बॉम्ब शोधक पथक कागलमध्ये दाखल झालंय . ताब्यात घेण्यात आलेले चारही युवक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

 

close