कसारा घाटातल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

April 6, 2014 1:19 PM0 commentsViews: 3050
nashik accident06 एप्रिल :  नाशिक जवळील कसारा घाटात आज पहाटे दोनच्या सुमारास दुधाचा टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत.
 दुधाचा टँकर संगमनेरहून मुंबईला जात असताना कसारा घाटात एका वळणावर हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी आहेत. जखमींना नाशिकमधील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
close