टी-20 फायनलमध्ये आज भारत भिडणार श्रीलंकेशी

April 6, 2014 2:43 PM0 commentsViews: 523

mal_koh_63006 एप्रिल : पहिल्या सेमीफायनलमध्ये डकवर्थ ल्यूईस नियमानुसार वेस्ट इंडिजचा पराभव करत लंकेने फायनलमध्ये आपले स्थान पक्क केले. तर दुसर्‍या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेटने धुव्वा उडवत टीम इंडियाने फायनलमध्ये दिमाखात एँट्री केली आहे. त्यामुळे फायनलच्या या मेगामुकाबल्याची उत्कंठा ही शिगेला पोहोचली आहे.

या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अव्वल झालीय् भारतानं संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच गमावलेली नाही तर प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः धुव्वा उडवत भारतानं फायनल गाठली आहे. लंकेनेसुद्धा या स्पर्धेत फक्त एकच मॅच गमावली आहे. त्यामुळे या मेगाफायनलमध्ये भारताच्या तुफान बॅटिंगला आव्हान असेल ते लंकेच्या तितक्याच उत्तम फॉर्मात असलेल्या बॉलर्सचं.

भारताची बॅटिंग ऑर्डर कमालीचे रन्स करतेय. टीम इंडियाचा जवळपास प्रत्येक बॅट्समन या स्पर्धेत फॉर्मात आला आहे. तर लंकेच्या बॉलर्सनंही त्यांना मोक्याच्या क्षणी विकेट घेत मॅच जिंकून दिल्यात. त्यामुळे ही जुगलबंदी या संडे ब्लॉकबस्टरमध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे. पण महत्वाचं म्हणजे या स्पर्धेत कोणीही विजेतेपद पटकावलं तरी टी 20 वर्ल्ड कप हा भारतीय उपखंडातचं राहणार आहे.

close