अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली वरुण गांधीची याचिका

March 25, 2009 7:12 AM0 commentsViews: 3

25 मार्च. अलाहाबाद हायकोर्टाने वरुण गांधी यांची याचिका फेटाळली आहे. पिलीभीत भाषण प्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली अदखलपात्र गुन्ह्याची केस रद्द करण्यात यावी म्हणून वरुण गांधी यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मतदारसंघात भाजपचे युवा उमेदवार आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असं भाषण 6 मार्चच्या सभेत केलं होतं. भाषणात त्यांनी मुस्लिमांवर टिकेची झोड उठवत सर्व हिंदूनी एका बाजूला करुन उरलेल्यांना पाकिस्तानात पाठवायला हवं अशी विधानं केल्याचं निवडणूक आयोगाला आढळलं होतं. निवडणूक आयोगाच्याच निर्देशावरुन पिलीभीत जिल्हाधिकार्‍यांनी कलम 153-अ, 123-अ, आणि 123-ब या कलंमांखाली अजामिनपात्र गुन्हा दाखल केला होता.

close