यु ट्युबच्या क्लिपमुळे भडकले शिवसैनिक

March 25, 2009 9:14 AM0 commentsViews: 2

25 मार्चयू ट्युबवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप आढळली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेनं या व्हिडिओ क्लिपला तीव्र विरोध केलाय. या क्लिपमध्ये बाळासाहेंबाबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी सेनेने केलाय. याप्रकरणी भारतीय विद्यार्थी सेनेने निषेध व्यक्त करून हा व्हिडिओ काढून टाकण्यात यावा अशी मागणी केलीय. याबाबत ताबडतोब कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. या आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपविरोधात विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

close