गोपीनाथ मुंडेंची भाजपबद्दल जाहीर नाराजी

March 25, 2009 9:53 AM0 commentsViews: 1

25 मार्च, मुंबईकिरीट सोमय्यांना तिकीट देण्यावरुन गोपीनाथ मुंडे अजूनही नाराज आहेत. यापुढं भाजपकडून काहीही मागणार नसल्याचं सांगून मुंडे यांनी जाहिररित्या आपली नाराजी व्यक्त केलीये. उत्तर-पूर्व मुंबईतून पूनम महाजन यांना तिकीट मिळावं म्हणून मुंडे आग्रही होते. पण गडकरी गटाची सरशी झाल्याने शेवटी भाजपने किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली. ईशान्य-मुंबई हा मतदारसंघ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा होता. त्यामुळं त्या जागेवर पूनम यांनी उमेदवारी मागितली त्यात गैर काय असा युक्तीवादही त्यांनी केला.

close