टी 20 वर्ल्ड कप फायनल: श्रीलंकेसमोर 131 रन्सचं आव्हान

April 6, 2014 9:16 PM0 commentsViews: 182

herath_0604icc_63006 एप्रिल :  टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं लंकेसमोर 131 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. संपूर्ण स्पर्धेत भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीच्या शानदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने हे टार्गेट ठेवलं आहे.

फायनलमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतल.  तर आज भारताची बॅटिंग अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. सुरुवातीपासून भारताला धक्के बसले. अजिंक्य रहाणे लगेचच बाद झाला, तर सुरवातीच्या टप्प्यात कोहलीलाही लय सापडली नव्हती. त्यामुळे भारताची धावगती मंदावली होती. रोहित शर्माने आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केला; मात्र याच प्रयत्नांत तो बाद झाला. पण कोहलीनं 77 रन्सची शानदार इनिंग पेश केली.

तर दुसरीकडे श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली आहे. मोहीत शर्माने कुसाल परेराला 5 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं.

close