सूडाची भाषा भोवली, अमित शहांविरोधात FIR दाखल

April 6, 2014 9:43 PM0 commentsViews: 397

amit saha06 एप्रिल : भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी अमित शहा यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात FIR दाखल झालाय.

मुजफ्फरनगर दंगलीचा सूड उगवण्याची, दंगलग्रस्त जाट समाजाने बदला घेण्याची भाषा शहा यांनी केली.  आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे लाठी काठ्या-गोळ्यांची ही वेळ नसून आता निवडणुकीत बदला घेण्याची ही संधी आलीय, मोगलाच्या जमान्यात तलवारीने बदला घेतला जायचा पण आता बटन दाबून बदला पूर्ण करायचाय त्यांनंतर त्यांची जागा दाखवू असं वादग्रस्त व्यक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशाचे प्रभारी अमित शाह यांनी होतं.

मुजफ्फरनगरच्या दंगलग्रस्तांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत हा गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक आयोगानेही शहा यांच्या वक्तव्याची दखल घेत शहांच्या भाषणाची सीडी मागवली होती. बिजनौर पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे.भारतीय दंड विधान कलम 153 (के) आणि 125 (आरपी) नुसार FIR दाखल करण्यात आल आहे.

दरम्यान ही कारवाई सुडबुद्धीनं केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तसंच सपा, बसपा आणि काँग्रेसवर टीका केलीय.

 

close