श्रीलंकेने पटकावला टी-20 वर्ल्ड कप

April 6, 2014 10:17 PM0 commentsViews: 905

sangakara06 एप्रिल :   श्रीलंकेनं टी 20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं आहे. भारताचा 6 विकेटने दणदणीत पराभव करत श्रीलंकेने टी 20 वर्ल्ड कपचे चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे.

प्रथम टॉस जिंकून श्रीलंकेने भारताला पहिली बॅटिंग करण्याची संधी दिली. विराट कोहलीच्या तुफानी 77 रन्सच्या जोरावर भारताने लंकेसमोर विजयासाठी 131 रन्सचं आव्हान ठेवलं. पण विजयाचं हे सोपं आव्हान श्रीलंकेने आपले 6 विकेट राखून आरामात पार केलं.

भारताची तुफानी बॅटिंग मात्र या मॅचमध्ये चालली नाही. अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंग झटपट स्कोर करण्यात अपयशी ठरले तर रोहित शर्मानं 29 रन्स केले. पण भारतातर्फे विराट कोहलीने 58 बॉल्समध्ये 77 रन्स ठोकले. श्रीलंकेने हे आव्हान अगदी सहज पार केलं. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पण महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या लंकेच्या अनुभवी बॅट्समनने लंकेला अखेर वर्ल्ड कप जिंकून दिला. जयवर्धनेने 24 तर कुमार संगकाराने 35 बॉल्समध्ये 6 फोर आणि 1 सिक्स ठोकत 52 रन्स केले आणि अखेर श्रीलंकेने टी 20 वर्ल्ड कपच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

याआधी 2009 आणि 2012च्या फायनलपर्यंत पोहोचलेल्या श्रीलंकेला वर्ल्ड कप विजयावर नाव कोरता आलं नव्हतं पण ती खंत आज त्यांनी भरून काढली. तर धोणीच्या यंग ब्रिगेडचं दुसर्‍यांदा टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न मात्र भंग पावलं.

close