मलेशियाच्या बेपत्ता विमान:हिंदी महासागरात मिळाले इलेक्ट्रॉनिक सिंग्नल्स

April 6, 2014 10:49 PM0 commentsViews: 1021

mh37006 एप्रिल :   मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाबद्दल आता पुन्हा थोडी आशा निर्माण झालीय. चीनी नौदलाला हिंदी महासागराच्या दक्षिणेकडे काही इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल्स मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या नौदलानेही या सिग्नल्सचा शोध घ्यायला सुरुवात केलीय.

पण हे सिग्नल्स बेपत्ता विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून मिळत आहेत का याबद्दल अजून नेमकं काही सांगता येत नाही. हे विमान बेपत्ता झालं त्याला आता सुमारे एक महिना होईल. पण अजूनही या विमानातल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना नेमकी कोणतीच माहिती मिळालेली नाही.

close