लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात

April 7, 2014 11:16 AM0 commentsViews: 813

votting07 एप्रिल :  बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे. 9 टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होतं आहे. आज पहिल्या टप्प्यात ईशान्येकडच्या आसाम आणि त्रिपुरा या दोन राज्यांमधल्या 6 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु झालं आहे.

दोन्ही राज्यांमध्ये 76 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतायेत. आसाममध्ये एकूण 13 मतदारसंघ आहेत. त्यातल्या लखीमपूर, तेजपूर, कालीबोर, जोरहाट आणि दिब्रुगढ या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होतं आहे. यात जवळपास 8 हजार 588 संवेदनशील मतदारसंघ आहेत. त्रिपुरामध्ये एका जागेसाठी मतदान होतं आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून इथेही पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

close