भाजपचं पुन्हा राम मंदिर, आर्थिक विकासाचा ‘संकल्प’

April 7, 2014 12:36 PM0 commentsViews: 2358

bjp manifesto07 एप्रिल :  लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरवात झाली. प्रगती आणि आर्थिक मुद्यांवर भर देत भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राम मंदिर, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, कलम ३७०वर चर्चा, तसेच भ्रष्टाचार रोखणे, रोजगार निर्मिती, काळा पैसा, महिलांची सुरक्षा अशा अनेक समस्यांवर प्रभावी योजनांचे आश्वासन देत ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देत भाजपचे ज्येष्ठे नेते आणिनिवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावळी भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

महागाई काबूत आणणं आणि कर प्रणालीत बदल करणे याला आपलं प्राधान्य असेल असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. मल्टी ब्रॅण्ड रिटेलमधली गुंतवणूक वगळता इतर क्षेत्रातल्या FDI ला भाजपचा पाठिंबा असेल. काळा पैसा भारतात परत आणणं, धोरण लकवा हाताळणं याही मुद्द्यांवर भाजपने भर दिला आहे. सोबतच आपलं सरकार आल्यास GST कर प्रणाली लागू करण्याचंही भाजपने या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

त्याच बरोबर ‘घटनेच्या चौकटीत राहून राम मंदिर बांधण्यासाठी सर्व प्रयत्न करणार’ असल्याचं आश्वासन भाजपंच्या जाहीरनाम्यात आहे. तसंच कलम 370 बद्दल सगळ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनंही जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन, त्यांना जमीन आणि सुरक्षा देण्याच्या मुद्याचाही उल्लेख जाहीरनाम्यात आहे.

त्याचप्रमाणे मदरशांचं आधुनिकीकरण करण्याचं आणि उर्दूच्या संवर्धनाचंही आश्वासन देण्यात आलं आहे. बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान, संसद आणि विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षणाचा मुद्दाही यात आहे.

विशेष : महागाई, रोजगार, भ्रष्टाचार निर्मुलन, काळा पैसा, धोरण लकवा, प्रशासकीय सुधारणा, टीम इंडिया(सर्वांची भागीदारी), विकेंद्रीकरण, निवडणूक सुधारणा, पोलिस, न्यायिक आणि प्रशासनिक सुधारणा करणे याला आपलं प्राधान्य असेल असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय.

 • महागाई काबूत आणणं आणि कर प्रणालीत बदल करणे
 • काळा पैसा भारतात परत आणणं, धोरण लकवा हाताळणं याही मुद्द्यांवर भाजपचा भर
 • मल्टी ब्रॅण्ड रिटेलमधली गुंतवणूक वगळता इतर क्षेत्रातल्या FDI ला भाजपचा पाठिंबा
 • सोबतच आपलं सरकार आल्यास GST कर प्रणाली लागू करणार
 • राम मंदीराचा उल्लेख घटनेच्या चौकटीत राहून राम मंदीर उभारण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार
 • काश्मीर – कलम 370 बाबात सर्वांशी चर्चा करणार – काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन, त्यांना जमीन आणि सुरक्षा देणार
 • समान नागरी कायदा आणण्याचं आश्वासन
 • मदरशांच्या आधुनिकीकरण मुस्लीम मुलींना शिक्षण आणि नोकर्‍या देण्यात प्रोत्साहन
 • बालिका समृद्धी, लाडली लक्ष्मी, चिरंजीवी योजनांचं आश्वासन
 • बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान संसद आणि विधिमंडळात महिलांना 33 टक्के आश्वासन
 • शेती विमा योजना आणणार
 • शेतकर्‍यांसाठी प्रादेशिक वाहिन्या
 • शास्त्रीय तपासणीशिवाय जीएम पिकांना परवानगी नाही
 • आरोग्यासाठी नवं धोरण
close