पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा

March 25, 2009 2:54 PM0 commentsViews: 8

25 मार्चपंतप्रधानपदासाठी पवार यांचं नाव पुढे न करता राष्ट्रवादीने आता मनमोहन सिंग यांनाच पाठिंबा देण्याचं निश्चित केलंय. गेले काही दिवस पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु होती. आता डॉ. मनमोहनसिंग हेच युपीएच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनी दिल्लीत सांगितलं आहे. सहा महिन्यांपासून शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यासाठी पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती. पक्षांतर्गत नेतेपदासाठी शरद पवारांनाच प्राधान्य असलं तरी युपीएच्या पंतप्रधानपदासाठी मात्र उमेदवार म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांच्याच नावची घोषणा करण्यात आली आहे.

close