EVM मशीन मध्ये घोळ; तीनचं बटन दाबता दुसर्‍याला मतदान

April 7, 2014 10:37 AM0 commentsViews: 3225

sc-asks-ec-to-install-electronic-voting-machines-issuing-paper-receipts-to-voters-for-2014-polls_08101301052907 एप्रिल :  आसाम आणि त्रिपुरामध्ये मतदान सुरू आहे, तर महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या सर्व 10 जागांसाठी 10 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र EVM मशीनमध्ये तीन नंबरचं बटन दाबल्यावर 2 नंबरच्या उमेदवाराला मत मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात पाहायला मिळाला.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतल्यानंतर हे मशीन काढून टाकण्यात आली आहे. गोंदियातल्या सरकारी आयटीआयमध्ये काल सकाळपासून बॅलेट युनिट तयार करण्याचं काम जोरात सुरू होतं. गोंदियामध्ये EVM मशीनच्या लिस्ट नुसार नंबर 2 वर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल आहेत तर तीन नंबरवर बसपचे उमेदवार डॉ. संजय नासरे आहेत. रात्री 11 च्या सुमाराला हा प्रकार उघड झाला. त्यानंतर सर्व मशीन आपल्यासमोरच तपासावीत अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ह्या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला निवडणूक अधिकारी तयार नाहीत.

close