मनीष तिवारींना जामीन मंजूर

April 7, 2014 2:57 PM0 commentsViews: 796

tiwari gadkari07 एप्रिल : आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्याविरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केलाय.

हा दावा मुंबईतील किला कोर्टातील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकार्‍यांच्या कोर्टात केलाय. मनीष तिवारींनी कोर्टात हजर व्हावं म्हणून कोर्टानं तिवारींना वॉरंट बजावलं होतं. या प्रकरणामध्ये आज मनीष तिवारी आज कोर्टात हजर राहिले.

कोर्टानं 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिवारींना जामीन दिलाय. गडकरी यांच्या ड्रायव्हरचा वादग्रस्त आदर्श सोसायटीत फ्लॅट असल्याचं वक्तव्य तिवारींनी केलं होतं.
.

close