शाळेत चिमुरडीवर अत्याचार, पालकांनी दिला संशयिताला चोप

April 7, 2014 4:19 PM1 commentViews: 4181

pune atyachar07 एप्रिल : पुण्याच्या सिंहगड स्प्रिंगडेल शाळेतल्या एका चिमुरडीवर शाळेच्या बस अटेंडण्ट आणि ड्रायव्हरनं अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेकडो पालकांनी आज (सोमवारी) शाळेत आंदोलन केलं. काही पालकांनी संशयित ड्रायव्हर आणि अटेंडण्टला मारहाणही केली.

सिंहगड स्प्रिंगडेलचे अध्यक्ष मारूती नवले यांच्याशी पालकांनी वारंवार संपर्क साधूनही ते न आल्याने पालक जास्तच संतप्त झाले. ते आल्यावर त्यांनाही संतप्त पालकांनी मारहाण केली. शाळेच्या व्यवस्थापनाला हा प्रकार कळवूनही त्यांनी कारवाई करण्यात वेळकाढूपणा केल्याचा पालकांचा आरोप आहे.

शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रारीची दखल न घेतल्याने संबंधित मुलीच्या पालकांनी शाळेतल्या इतर पालकांना याबाबत सांगितलं. या प्रकरणी पालकांच्या आंदोलनानंतर डेक्कन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

  • Rohan Shinde

    Bus attendant must be a lady, but who will guard her by looking @ the unhuman things?

close